डॉ. नरेंद्र वैद्य, सांधेरोपण तज्ज्ञ आणि संचालक लोकमान्य रूग्णालय पुणे
पुणे – गुडघ्याची सांधेदुखी व पाठदुखी हा मनुष्याला मिळालेला शापच आहे. मनुष्य हा प्राणीच केवळ दोन पायावर चालू शकतो. अशावेळी चालण्यामध्ये पाठीचा कणा व त्याभोवतालचे स्नायू सतत गुरूत्वाकर्षणाच्या व इतर दबावाच्या विरूद्ध काम करत असतात. चालताना संपूर्ण शरीराचा भार हा गुडघ्यांवर पडत असतो. तसेच बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, कामाचे बैठे स्वरूप यामुळे शरीरामध्ये लठ्ठपणा येतो. पाठदुखी व गुडघ्याच्या वेदनाही अधिक प्रमाणात होतात.
वयोमानाप्रमाणे झालेली गुडघ्यातील कुर्चेची झीज यामधील सुरूवातीचा टप्पा (Osteoarthritis) , तरूणवयात आमवातामुळे असलेली सांधेदुखी (Rheumatoid artimitis) , अपघातामुळे तसेच खेळताना खेळाडूंना पडल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये लेझरचा उत्तम फायदा होता. सांध्यांमध्ये असणाऱ्या जंतुसंसर्गामुळे झालेल्या आजारामध्ये लेझरद्वारे उपाय करून रूग्णांस आराम मिळतो. गुडघ्यांच्या बंधाच्या इजांवर तसेच खांदा वारंवर निखळणे तसेच वाढीच्या मणक्याच्या आजारामध्ये लेझरद्वारे उपाय केले जातात. होल्मियम याग लेझर या उपकरणाद्वारे पाण्यामध्ये व जैविक ऊती (Biological tissue Containing Water) यामध्ये होल्मियम लेझर किरण अधिक शोषले जातात. लेझरची ऊर्जा अधिक तापमानामध्ये अगदी ०.५ मिमि उतीच्या खोलीवर जाऊन काम करते व ऊतींना एकमेकांपासून वेगळे केले जाते.
खेळाडूंना होणाऱ्या इजा मुख्यतः गुडघ्यातील बंध, गादी, खांदयातील सांध्या ठिकाणचे स्नायू, बंध याठिकाणीही इलाज झाल्यास आजकाल दुर्बिणीद्वारे तपासणी व उपचार केले जातात. त्याला आर्थोस्कोपी असे म्हणतात,
आर्थोस्कोपी व लेझरचे फायदे –
शस्त्रक्रियेनंतर एका दिवसात रूग्णाला रूग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो
कमीत कमी रक्तस्त्राव, स्थानिक भूल किंवा स्पाईनल भूल देऊन शस्त्रक्रिया करता येते
छोटा छेद, कमीत कमी टाके व शस्त्रक्रियेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रूग्ण चालू शकतो.
शस्त्रक्रियेनंतरचे धोके टाळले जातात