शालेय मंत्री व अप्पर मुख्य सचिवास संघटनेचे पत्र
गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी) – संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दि.२४ सप्टेंबर रोजी दिलेल्या एका
पत्रानुसार महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व विद्यार्थी यांचा शिक्षणाबाबत आँफलाईन-आँनलाईन साप्ताहिक अहवाल मागवला आहे .
वेळोवेळी पर्यवेक्षीय यंत्रणेकडून याबाबत माहिती घेत असतांना हा सप्ताहिक अहवाल भरून घेणे म्हणजे शिक्षकावर अविश्वास दाखवणे आहे अशी संघटनेची धारणा आहे.यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्याप्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.या बाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने नुकतेच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड व अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभागाच्या वंदना कृष्णा मँडम यांना दि.३०सप्टेंबर रोजी पत्र पाठवून अहवाल रद्दची मागणी केली आहे.
शिक्षक सध्या आँनलाईन -आँफलाईन अध्यापना बरोबरच आपत्कालीन व्यवस्थेत आपली सेवा देत आहेत . या दुहेरी कामाचा बोजा पडत असतांना सुद्धा शिक्षक प्रामाणिक पणे वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून आपले अध्यापनाचे काम नियमितपणे करत आहेत. कोव्हीड ड्युटीमुळे अनेक शिक्षक व त्याचे परीवारास कोरोनाने ग्रासले आहे.
ग्रामीण भागातील स्थिती पहाता हा अहवाल भरण्यासाठी पुन्हा शिक्षकांना मोठ्या गावात /शहरात कँफेवर जावून अहवाल भरण्याचे काम करावे लागेल. तरी शासनाने या निवेदनाची दखल घेवून तात्काळ अहवाल घेण्याचे पत्र रद्द करणेबाबत संबधतांना अदेशीत करावे, अन्यथा संघटना सामुदायिक रित्या अहवाल लिंक भरण्यावर बहिष्कार टाकेल अशा माहितीचे पत्र राज्याध्यक्ष देविदास बस्वदे,राज्यउपाध्यक्ष रवींद्र सोनवणे,सरचिटणीस कल्याण लवांडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी यांनी पत्राद्वारे दिली आहे.







