गुढे.ता.भडगांव (प्रतिनिधी) – येथून गावापासून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या नावरे गावालगत गिरणा नदीवर पुल बांधण्यात यावा याबाबत गुढे ग्रामस्थांनी नुकतेच खा.उन्मेष पाटील यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
गुढे-नावरे गिरणा नदीवर पुल बांधण्यात यावा याबाबत गेल्या ३५वर्षांपासून मागणी केली जात आहे या मागणीकडे आजपर्यंतच्या सर्वच पक्षाच्या आजी,माजी आमदार खासदार यांनी दुर्लक्ष केल्यामुळे येथे पुल बांधण्यात आला नसल्यामुळे परिसरातील २०ते २२खेडयांच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गुढे येथील एकूण क्षेत्रफळापैकी ५०टक्के क्षेत्र हे गिरणानदी पलीकडे असून हे सर्व क्षेत्र बागायती, बळबागायती, भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र आहे. येथील शेतकऱ्यांना दररोज नदीचे पाणी व वाळू तुडवत जावे-यावे लागते म्हणून मोठी दमछाक व हाल होत असतात पावसाळ्यात व रब्बी,उन्हाळी हंगाम व पिण्याच्या पाण्याचे आर्वतन सुटल्यावर शेतकऱ्यांना शेतात जाणेच बंद होते. बागायती फळबागायती शेती असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे अत्यावश्यक आहे म्हणून शेतकरी पिक व फळे वाचवण्यासाठी सावदे मार्गे दररोज परतीच्या प्रवास १६कि.मी.असल्याने शेतकरींचा मोठा वेळ,श्रम,पैसा व हाल होत आहे अशा वेळी मजूर शेतात घेऊन जाणे म्हणजे दुप्पटीचा खर्च होतो म्हणून शेतकरी त्रस्त व वैतागून गेला आहे म्हणून नको ती म्हणून अनेकांनी चांगली बागायती जमीन विकून टाकली आहे.तसेच नावरे,वाडे कजगांव,श्रीक्षेत्र कनाशी,भडगांव,चाळीसगाव आदी ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अंतराच्या लांब फेऱ्यातून जावे यावे लागत आहे.
जर पुल झाल्यास…
जर पूल झाल्यास परिसरातील सावदे,दलवाडे,नावरे,वाडे,गोंडगांव,कजगांव,श्रीक्षेत्र कनाशी भडगांव चाळीसगाव,पारोळा आदी ठिकाणी व इतर खेड्यांंना पुल जोडला गेल्यावर परिसरातील २०ते २२खेडे एकमेकांना जोडले जाऊन हा पुल नवीन दळणवळणासाठी मोठ्या सोयीचा उपयोगाचा ठरणार आहे यापुलामुळे शेतकरीच नाही तर इतर गांवे जोडले जाऊन हा नवीन पुल व रस्ता उदयास येणार आहे.
पुलाला ग्रहण
या पुलाबाबत नेहमीच मोठ्या चर्चा होत असते पण याला ग्रहण लागल्याने हे ग्रहण आता कोण सोडवतो हा मोठा चर्चेचा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे येथील शेतकरी वेळ,श्रम, पैसा वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून नदीला पाणी असून शेतात जात येत आहे पण मजुर जात नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे म्हणून शेतकरी त्रस्त झाले म्हणून येथील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ माळी,राहुल पाटील,संजय पाटील,विलास पाटील,अमोल बोरसे,सोमनाथ पाटील आदी शेतकऱ्यांनी भेट घेऊन मागणी व समस्यांंचे निवेदन दिले. यावेळी खासदार यांनी संबंधित प्रशासनाला विचारपूस करून यातून मार्ग काढून आपण प्रयत्न करू असे सांगितले .