जळगाव;- राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत अादेश जारी केले अाहेत. त्यानुसार जळगाव जिल्हा सरकारी नाेकरांची सहकारी संस्था (ग. स) ची निवडणूक येत्या एप्रिल जून महिन्यात हाेणार अाहे. या निवडणुकीत सर्व समावेश पॅनल बनविण्यासाठी महाविकास गटाची तातडीची बैठक रविवारी दुपारी पद्मालय विश्रामगृह येथे घेण्यात आली . बैठकीत महाविकास आघाडी स्वतंत्र पॅनल उभारून निवडणूक लढविणार असल्याचे महाविकास गटाचे नेते नाना पाटील यांनी आज बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषद मध्ये सांगितले .
याप्रसंगी ईश्वर सपकाळे, नाना पाटील, संदीप पवार, राधेश्याम पाटील, नरेंद्र सपकाळे, राजेश जाधव, रमेश बोरसे ,संदीप पाटील,सचिन सरकटे ,अनिल चौधरी (,चंद्रशेखर साळुंखे ,नंदू पाटील , आदी यावेळी उपस्थित होते . नाना पाटील पुढे म्हणाले कि , ग. स. निवडणूक हि सभासद हितासाठी आणि बदल घडविण्यासाठी महाविकास गट निवडणुकीत उतरत आहे . त्यासाठी आम्ही मार्च महिन्यापासून तालुका मेळावे घेण्याचे ठरविले आहे. प्रत्येक तालुक्यात जाऊन सभासदांशी संवाद साधून महाविकास गटाचा अजेंडा तयार करणार असल्याचे नाना पाटील यांनी सांगितले . सभासद हितासाठी महाविकास गट सर्व विभागातील कर्मचारी, संघटना यांच्याशी चर्चा करणार आणि महाविकास गटाचा अजेंडा तयार करतांना डि.सी.पी.एस.धारक सभासदांसाठी काय करता येईल हे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू जेणेकरून डीसीपीएस धारक बांधव यांना मदत होईल. त्याच बरोबर सभासदांसाठी स्वतंत्र विमा योजना लागू करण्याचे प्रयत्न करू, जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी ग.स. सोसायटी जळगाव कार्यकारी मंडळ बरखास्त करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनी संस्थेवर प्रशासक बसवल्याने त्या निर्णयाचे स्वागत महाविकास गट करतो. ग.स. सभासद जाणून आहे की तेच तेच संचालक १५ २० वर्षापासून निवडून येत आहे. पण त्यांनी काहीच केले नाही फक्त निवडणुका जवळ आल्या की गट बदल करायचा आणि सभासद हितासाठी आम्ही करतो अशा भूलथापा मारायच्या अशा गोष्टींना आता सभासद कंटाळले आहे म्हणून सभासद नविन पर्याय म्हणून महाविकास गटाकडे पाहात आहे. असेही नाना पाटील यांनी सांगितले .








