जामनेरात सकल बंजारा, लमाण समाजातर्फे आयोजन
जामनेर (प्रतिनिधी) : महायुती सरकारच्या वतीने संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. तसेच पोहरागड येथे ७०० कोटींचे विकास कामे, मुंबई येथे बंजारा समाज कल्याण भवन व गोर बंजारा साहित्य अकादमीचे कामही प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनेही बंजारा कल्याण बोर्डाची स्थापना केली आहे. याबद्दल आज जामनेर येथे सकल बंजारा व लमाण समाजाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी बंजारा समाजाचे संत गण व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बंजारा बांधव यांनी पारंपरिक वेशभूषेत कार्यक्रमात लक्ष वेधून घेतले. गिरीश महाजन यांना डोक्यावर पगडी व पारंपरिक उपरणे टाकून मानण्यात आले. प्रसंगी समाज बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता.