भुसावळ(प्रतिनिधी) :- शहर व तालुक्यातील गरजु रुग्णांसाठी मोलाचे ठरत असलेले ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर येथे अत्याधुनिक साहित्यां सह शवविच्छेदन कक्षाचे भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी विशेष कक्ष उभारण्यात आलेला होता परंतु शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेला साहित्यांची कमतरता असल्याने तेथे कार्यरत डॉक्टरांना बऱ्याच वेळेस अडचणीचा सामना करावा लागत असे. परंतु शासनातर्फे नवीन व अत्याधुनिक साहित्य जसे पी. एम .टेबल, बॉडी फ्रिझर,पी. एम ट्रॉली,विविध अवजारे,वजन काटा आदी अत्याधुनिक सामुग्री मिळाल्याने शवविच्छेदनासाठी कमी वेळ लागणार आहे. तसेच मयतांच्या नातेवाईकांना व पोलीसांना मृतदेहाच्या विच्छेदनासाठी तात्काळत उभे राहावे लागणार नाही.शिवाय आता आपत्कालीन वेळेत रात्रीही शव विच्छेदन करण्यास अडथळा येणार नाही.
यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी (निवासी)डॉ सुशांत सुपे,वैद्यकीय अधिकारी डॉ विजय कुरकुरे, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी सहसंयोजक डॉ. नि तु पाटील, डॉ सनी जैन, डॉ असिफ पठाण, डॉ कोटेचा, डॉ. रामवंशी तसेच भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, मुकेश पाटील, सतीश सपकाळे,पवन बुंदेले, सरचिटणीस संदीप सुरवाडे श्रेयस इंगळे, धनराज बाविस्कर ,विशाल जंगले, रेहमान शेख, कैलास पाटील, सागर जाधव आणि सर्व कर्मचारी वर्ग आदींची उपस्थिती होती.