जळगाव (प्रतिनिधी) : – राज्याच्या ग्राम विकास विभागांतर्गत २०२३-२०२४ सालचा गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्कार जाहिर करण्यात आला. कर्मचारी व पदाधिकारी यांच्याशी उत्तम संबंध, कामातील वक्तशीरपणा, वेळोवेळी जिल्हा परिषदेची प्रतिमा जनमानसात उंचावण्याकरिता केलेले प्रयत्न, खर्चात केलेली काटकसर इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन ह्या पुरस्कारासाठी पात्रता ठरवली जात असते.
महाराष्ट्र विकास सेवा स्तरावर नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपूरे व अकोला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे. तसेच जिल्हा परिषद गट क मधील एकूण २७ कर्मचारी यांना पुरस्कार घोषित झाला आहे. दरम्यान, प्रमोद पवार आणि दिगंबर लोखंडे यांनी जिल्हा परिषद जळगावअंतर्गत गट विकास अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले आहे.