प्रशासनाचे दुर्लक्ष वाळू चोरी थांबवा
गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी)- गुढे गांवासह परिसरातील सावदे, दलवाडे गिरणा नदी पात्रातून सरास टायरच्या बैलगाडाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात दिवसारांंत्री अवैध वाळूचा उपसा होत असून याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून येथील वाळू चोरी थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गुढे, सावदे,दलवाडे गिरणा नदी पात्रातून दिवसरात्र बैलगाडीधारक मोठ्या प्रमाणात गिरणा नदी पात्रातून विना परवानगी वाळूची चोरी केली जात आहे.
गुढे येथील गाडीबैलधारक गुढे ,जुवाडी व पथराड येथे तर गोंडगांव येथील गाडी बैलधारक सावदे,दलवाडे नदी पात्रातून सरास दिवसरात्र वाळूची मोठी चोरी करून विकत आहेत याबाबत वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील येथील वाळू चोरी थांबत नाही.याकडे महसूल विभाग का दुर्लक्ष का?करत आहे याबाबत ग्रामस्थांना आश्चर्य वाटत आहे .गिरणा नदीला दहा दिवसापूर्वी पूर आल्याने येथील नदी पात्रातून तात्पुरती वाळू चोरी थांबली होती.नदीचे पाणी ओसरताच पुन्हा आठवडाभरापासून वाळूची चोरी पुन्हा जोमाने सुरू झाली आहे.आता तर नदी पात्रात पुरामुळे बारीक वाळू वाहून आल्याने वाळू चोरांना चांगलेच.फायदेशीर झाले आहे म्हणून वाळू चोरट्याची संख्या चांगलीच वाढल्याने नदीला यात्रेचे स्वरूप आले आहे.येथील वाळू चोरट्यांंवर कायदेशीर दंडात्मक मोठी कार्यवाही केली तरच येथील व सावदे,दलवाडे नदी पात्रातून वाळूची चोरी थांबेल अन्यथा नाही. गावातील ग्रामस्थ देखील वाळू चोरट्यांना रोखत नाही फक्त बघ्याची भूमिका बजावत असून येथील वाळू चोरी थांबली पाहिजे अशी अपेक्षा गप्पांंमधून व्यक्त करत आहेत पण वाळूची चोरी रोखण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्यानेच येथे दररोज वाळू चोरणाऱ्या बैलगाडी धारकांची संख्या वाढत आहे आता याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.