जळगांव (प्रतिनिधी) :- महावितरणच्या सावदा विभागातंर्गत असणाऱ्या गौरखेडा उपकेंद्रात पाच एम.व्ही.ए. क्षमतेचा नवीन पॉवर ट्रान्सफ़ॉर्मर बसविण्यात आला. अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आल्याचे सावदा विभागामार्फ़त कळविण्यात आले आहे.
गौरखेडा येथे बसविण्यात आलेला पॉवर ट्रान्सफ़ॉर्मर कृषी धोरण – २०२० योजनेतंर्गत मंजूर करण्यात आलेला होता. या नवीन पॉवर ट्रान्सफ़ॉर्मरमुळे गौरखेडा, लोहारा, कुंभारखेडा या भागातील कृषी वाहिनीवरील भार संतुलित होऊन येथील शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा करता येणार आहे. असे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी कळविले आहे. सदरील पॉवर ट्रान्सफ़ॉर्मरसाठी सावदा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता जयंत लढे, सहाय्यक अभियंता सुष्मा पाटील, सागर डोळे, चेतन चौधरी, विलास पाटील आदींनी परिश्रम घेतले.