पाचोरा ( प्रतिनिधी) – पी टी सी संचलित गो से हायस्कूल पाचोरा येथे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयात विद्यार्थिनींसाठी संगीत खुर्ची, धावणे, बुद्धिमत्ता ,लिंबू चमचा ,निबंध , गायन , स्मरणशक्ती विकास अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी विद्यार्थिनींमध्ये उत्साह दिसून आला दोन वर्षापासून मैदानी स्पर्धा, शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनामुळे बंद असल्यामुळे केवळ घरातच राहून ऑनलाईन क्लास देऊन विद्यार्थी वैतागले होते यावेळी शाळा सुरू आहेत त्यामुळे विद्यार्थीनींनी आनंदाने स्पर्धेत सहभाग घेतला पालकांमध्ये समाधान दिसून आले
स्पर्धेचे उद्घघाटन ज्येष्ठ शिक्षिका सौ अंजली गोहिल यांनी केले. याप्रसंगी ख्याध्यापक .सुधीर पाटील ,उपमुख्याध्यापिका सौ.वाघ , पर्यवेक्षक .एन. आर. पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.