पाचोरा ( प्रतिनिधी) दि.6 सप्टेंबर रोजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी गो.से. हायस्कूल पाचोरा येथे भेट दिली. संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते डॉ.सुधीर तांबे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी.जोशी,शालेय समिती चेअरमन दादासाहेब खलील देशमुख,तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन,एम. एम. महाविद्यालया प्र.प्राचार्य डॉ.वासुदेव वले,भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एम.गायकवाड सर,मुख्याध्यापिका पी. एम. वाघ, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आमदार तांबे यांनी शिक्षक,शाळा व संस्था चालकांच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .आर.एल.पाटील सर व आभार प्रदर्शन .ए.बी.अहिरे यांनी केले.