जळगाव (प्रतिनिधी) : गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जळगाव येथे पद्मालय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन झाली. अर्जुन जाधव यांना जिल्हाध्यक्ष देण्यात आले. त्यांना नियुक्तीपत्र प्रा. संदेश चव्हाण गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले.
त्याचबरोबर खान्देश विभागीय उपाध्यक्ष म्हणून माधव राठोड यांची नियुक्ती देखील यावेळेस करण्यात आली. तसेच जळगाव जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख राम राठोड, जामनेर तालुका सचिव अमोल पवार, जामनेर तालुका कोषाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जळगाव शहर उपाध्यक्ष दीपक जाधव यांचीदेखील नियुक्ती या वेळी करण्यात आली. पोलीस अधिकारी भिकन जाधव, सुभाष जाधव, गट विकास अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच गोर सेनेचे जिल्हा सचिव चेतन जाधव, गोरसेना जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अभिजीत चव्हाण, अनिल राठोड, प्रवीण चव्हाण, किशोर चव्हाण, गणेश चव्हाण तसेच गोर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.