जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली येथे श्रद्धेय डॉ.भवरलाल जैन याच्या 84 व्या जयंती दिनानिमित्त आज केशराई नगर व जिजामाता शाळा परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले .
निंब , पिंपळ , सिसम , करंज , गुलमोहर , चिंचोला , चिंच आदी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली . या प्रसंगी सरपंच प्रदीप पाटील , ग्रा प सदस्य रईस शेख, भावडू पाटील , भागवत पाटील , सुधीर पाटील, जेष्ठ नागरिक पंडित बारी, झिपरू पाटील यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक विक्रम अस्वार व सहकारी यांनी या वृक्षारोपणासाठी श्रमदान केले.