जळगाव ( प्रतिनिधी) – क्रिकेट खेळण्याच्या वाद मिटवाण्याच्या कारणावरून जळगावचे उप महापौर यांच्या घरावर गोळीबार करुन दशत माजविण्याचा प्रयत्न ?
आज दुपारी जळगाव पिप्राळा परिसरात येथिल एका शाळेत क्रिकेट खेळत असतांना एकमेकांना मध्ये वाद झाला होता. यावेळी जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तो वाद आपल्या परिसरात होत असुन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. म्हणून यात काही तरुणांना वाईट वाटल्याने आज रात्री 9:30 च्या सुमारास काही तरुण गाडीत येऊन उप महापौर पाटील यांच्या घराच्या समोर येऊन घरावर व हवेत गोळीबार केला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात कुलभूषण पाटील सुदैवाने बचावले असून ते आता तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्थानकात जात आहेत. घटनास्थळी रामानंदनगर पोलीस पोहोचली असुन पुढील तपास करीत आहेत. सदर याबाबत उप महापौर यांच्या सोबत संपर्क साधला असुन त्यांनी सांगितले पुढील तपास पोलीस करीत आहे.








