गोंदिया (वृत्तसंस्था) – गोंदिया-बल्लारशाह रेल्वेगाडीत मद्यपी प्रवाशांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळाली. रेल्वेगाडीत शुल्लक कारणावरुन धिंगाणा घातल्याने गोंदिया-बल्लारशाह रेल्वेगाडी तब्बल 30 मिनिटे रेल्वेस्थानकावर उभी ठेवावी लागली. हा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील हिरडामाली रेल्वे स्थानकावर आज सकाळी सव्वा आठ वाजता घडला.
हिरडामाली रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडी आल्यावर लोको पायलटने रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांच्या सुचनेसाठी असलेला अलाँन्सर सुरु केला. यामुळे दारु पिऊन आलेल्या मद्यपी रेल्वे प्रवाशाने लोको पायलटजवळ जाऊन त्याला अश्लिल भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेगाडीत एकच गोंधळ उडाला. रेल्वेतील प्रवाशी हा सर्व उडालेला गोंधळ पाहण्यासाठी खाली उतरले.अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर रेल्वे गार्डने आणि प्रवाशांनी मध्यस्थी करुन हा वाद संपवला. अन अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर गोंदिया- बल्लारशाह ही रेल्वेगाडी आपल्या दिशेने रवाना झाली. मात्र या मद्यपीच्या गोंधळामुळे सरकारी कर्मचा-यांची एकच तारांळ उडाली. अनेक अप-डाऊन करणारे कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहचू शकले नाहीत.