जळगाव – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे २०२० मध्ये परीक्षा घेण्यात आल्या नसून त्या नुकत्याच मार्च २०२१ मध्ये घेण्यात आल्यात. या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहिर झाले असून गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी पॉलिटेक्निकने उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामध्ये तिसर्या वर्षाच्या पाचव्या सत्रात इलेक्ट्रिकल विभागातील केवल रमेश पाटील हा विद्यार्थी ९३ टक्के गुण मिळवून तर मॅकेनिकल विभागातील अंतिम वषातील पाचव्या सत्रात अभिजीत विनोद पवार याने ९३.५२ टक्के गुण मिळवून अंतिम वर्षाच्या विभागात क्रमश प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला. बहुतांश विद्यार्थ्यांना अनेक विषयांमध्ये ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून गोदावरी पॉलिटेक्निकमधून मिळवलेले ज्ञान सिद्ध झाले.
गोदावरी पॉलिटेक्निक महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागात अंतिम वर्षातील पाचव्या सत्रात केवल रमेश पाटील याने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांंक तर द्वितीय डिंपल किशोर शिंपी हिने ९३.६० टक्के गुण आणि तृतीय क्रमांक जयेश अजय आंबेकर याने ९०.८० टक्के गुण मिळवले आहेत. याच विभागातील द्वितीय वर्षाच्या तिसर्या सत्रात प्रशांत सुभाष पाटील याल ९४.५० मिळवून प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मयुर पाटील श्रीरामे याला ८७.७५ टक्के गुण आणि तृतीय क्रमांक रेहान फिरोज शेख याने ८६.२५ टक्के गुण मिळवले आहेत. याच विभागातील प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रात अर्पिता सोमनाथ जाधव हिने ८७.७१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक युगल जगदीश रडे हिने ८७.५८ टक्के गुण आणि तृतीय क्रमांक कुंदा प्रशांत फिरके हिने ८६.७१ टक्के गुण मिळवून बाजी मारली.
मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षातील पाचव्या सत्रात अभिजीत विनोद पवार याने ९३.५२ टक्के गुण मिळवून प्रथम तर द्वितीय क्रमांक अरविंद रामचंद्र सोळंके याने ९१.९१ टक्के गुण आणि तृतीय क्रमांक काजल राकेश विश्वकर्मा हिने ९०.२९ गुण मिळविले आहेत. याच विभागातील द्वितीय वर्षाच्या तिसर्या सत्रात धनंजय विजय बागुल याने ८८.२१ टक्के मिळवून प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक साक्षी सुनिल अंभोरे हिने ८७.६८ टक्के गुण आणि तृतीय क्रमांक सुमेध प्रशांत देशमुख याने ८५.५७ टकके गुण मिलवले आहेत. याच विभागातील प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रात सत्यम विनोद चौधरी याने ८८.४३ टक्के मिळवून प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक ध्रुवराज किशोर बाविस्कर याने ७३.४३ टक्के गुण आणि तृतीय क्रमांक भावेश मधुकर पाटील याने ७३.२९ टक्के गुण मिळवून बाजी मारली.
गोदावरी पॉलिटेक्निकने अशा प्रकारे शैक्षणिक गुणवत्तेची गगनभरारी कायम ठेवली आहे अशी माहिती समन्वयक प्रा.दिपक झांबरे व प्रा.कैलास माखेजा व प्रा.चेतन विसपुते यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.एच.पाटील, उपप्राचार्य प्रा.प्रविण फालक, रजिस्ट्रार ईश्वर जाधव, प्रा.शफिक अन्सारी यांनी अभिनंदन केले.