जळगाव — गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बेसिक सायन्सेस अँड ह्यूम्यानिटीज विभागामार्फत राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, संजय पाटील(स्मरणशक्तीचे अभ्यासक,वक्ते व महाराष्ट्राचे गुगल) संजय पाटील प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख) तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद तसेच जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद तसेच माता जिजाऊ यांच्या विषयी मनोगते व्यक्त केली. प्रमुख वक्ते श्री संजय पाटील सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की दिवसेंदिवस स्मृतिभ्रंश होण्याचे प्रकार वाढत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर वाढत आहे शक्यतो कमी वापरून जास्तीत जास्त भर पुस्तकांवर द्यावा. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमितपणे योग साधना करणे आवश्यक आहे त्यामुळे एकाग्रता वाढते व कुठली गोष्ट लक्षात ठेवणे सहज शक्य होते. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर व कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, युवकांनी महापुरुषांच्या कार्याचे अवलोकन करून त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातून शक्य आहे.कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. नकुल गाडगे व प्रा. खुशाली बेलदार यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रथम वर्षाचे विद्यार्थी उत्कर्ष पाटील, नयन ललवाणी, यतीश भारंबे व काजल पाटील यांनी केले.