जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे १ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदला. पहिल्या दिवशी (१ सप्टेंबर) आठवड्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दुसर्या दिवशी (२ सप्टेंबर) हेल्दी क्विक ब्रेकफास्ट स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी, पौष्टिक आणि झटपट बनवता येणार्या नाश्त्याचे विविध पर्याय सादर केले.तिसर्या दिवशी (३ सप्टेंबर) विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत ऑउटरिच अॅक्टीव्हीटी अंतर्गत जेष्ठ नागरिकांच्या वृद्धाश्रमाला भेट दिली. त्याच दिवशी पोस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले, ज्यात पोषणाचे महत्त्व आणि संतुलित आहाराचे फायदे या विषयांवर विद्यार्थ्यांनी सृजनशील कल्पना मांडल्या.शेवटच्या टप्प्यात (८ सप्टेंबर) पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या संपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोषणाचे आणि आरोग्यदायी आहाराच्या सवयींचे महत्त्व समजावून देण्यासोबतच त्यांना आपली ज्ञानसंपदा आणि कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षक, विद्यार्थी व आयोजकांचे कौतुक करण्यात आले.