जळगाव – गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे विदयार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी दोन दिवसीय बी एम्प्लॉयेबल व्यक्तिमत्व व व्यावसायिक विकासावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
’प्राइम स्टेप’ संस्थेच्या सहकार्याने नर्सिंग विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण तांत्रिक व सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देऊन रोजगारसंधी निर्माण करण्यासाठी व उद्योग क्षेत्रातील कौशल्यांचा तफावत दूर करण्यासाठी ही कार्यशाळा, घेण्यात आली होती.या कार्यशाळेत प्राइमस्टेपच्या मार्गदर्शन वरिष्ठ व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक आकांक्षा सिंह यांनी केले. यामध्ये डिजिटल साक्षरता, आत्मविश्वास, भावनिक बुद्धिमत्ता, संवाद कौशल्ये, रिज्युम तयार करणे, तसेच मुलाखत तयारी या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी सर्वसमावेशक पद्धतीने रचलेले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायिक कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात यशस्वी कारकिर्द घडविण्यासाठी योग्य दिशा देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यशाळेत गोदावरी नर्सिंगचे विदयार्थी व प्राध्यापक सहभागी झाले.