जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एनएसएस युनिट मार्फत ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी झाडे लावा, पृथ्वी वाचवा या संकल्पनेवर राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ (दि. १ ते ७ जुलै) अंतर्गत गोदावरी नर्सिंग महाविद्यालय,जळगाव येथे १ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश वृक्षारोपणाच्या माध्यमातून दिला गेला.कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस युनिटच्या पुढाकाराने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एक विद्यार्थी – एक वृक्ष संकल्प घेत पर्यावरण रक्षणासाठी बांधिलकी व्यक्त केली.या उपक्रमामध्ये विविध औषधी, फुलझाडे आणि सावली देणार्या झाडांची लागवड करण्यात आली. परिसर सुशोभीकरणासह विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जाणीव वाढवण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.