जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्राचे जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
यावेळी श्रीमती गोदावरी आई पाटील यांच्यासह प्रमुख वक्ता म्हणून प्रा. व.पु. होले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (तंत्रनिकेतन समन्वयक), प्रा. अतुल बर्हाटे (तंत्रनिकेतन अधिष्ठाता) व सर्व विभाग प्रमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाची पूजा करून करण्यात आली.प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी जीवनात मराठी भाषेचा वापर कसा केला पाहिजे व आपलेच ग्रंथ जीवनात एकदा तरी अंमलात आणले पाहिजे हे नमूद केले. प्रा. व.पु.होले यांनी सांगितले जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ग्रंथालयात जा. शेवटच्या श्वासापर्यंत काय केले पाहिजे हे वाचनातून कळेल. जीवन जगताना नीतिमूल्य सांभाळा व तसे वागा. उद्दिष्ट ठेवा की मला समाधानाने जीवन कसं जगता आलं पाहिजे, मला माझं कौशल्य कसं वाढवता आलं पाहिजे. या संबंधित त्यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरज चौधरी यांनी केले.