जळगाव ( प्रतिनिधी ) – मधुबन मे कन्हैया…, वो किसना है…, गोविंद बोलो हरी गोपाळ बोलो…, मोरी बन्सी बजे.इया… अशा विविध हिंदी मराठी रिमिक्स गीतांवर कृष्ण, राधा, गोपिका यांनी नृत्य केले.. निमित्त होते श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे..
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता दही हंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ आर्विकर, गोदावरी नर्सिंग प्राचार्य विशाखा वाघ, डॉ केतकी पाटील नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य शिवानंद बिरादार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन व दहीहंडी पूजन करण्यात आले. यावेळी राधा कृष्णाच्या पेहरावात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळ उत्साहात पार पडले. मान्यवरांनी श्री कृष्णाच्या लीला सांगून कार्यक्रमाचे कौतुक केले.
त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी गृप करुन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करुन आनंद लुटला. यात सर्व एएनएम, जीएनएम, बीएस्सी, टिचर्स यांचा समावेश होता. अखेरीस मुलींच्या गृपने दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला. यंदाच्यावर्षी बेस्ट राधा कृष्ण यामध्ये जीएनएम मधील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जयेश लडे तर जीएनएम तृतीय वर्षातील रश्मी कचोडकर यांना मान मिळाला.
बेस्ट कृष्ण व राधा अवॉर्ड कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची, प्रेषित यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासक अधिकारी प्रवीण कोल्हे, प्रा. पीयूष वाघ, प्रा.पीयूष वाघ, प्रा. अस्मिता जूमडे, प्रा. प्रियांका गवई आदींनी केले.