जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध शाखांच्या १७ प्राध्यापकांनी नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स लर्निंग (एनपीटीईएल) या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही परीक्षा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी आयोजित करण्यात आली होती.
आयआयटी तसेच आयआयएससी यांच्यातर्फे संचलित उच्चतंत्र शिक्षणातील विषयांवरील अभ्यासक्रम पूर्ण करीत विविध शाखांच्या अनेक प्राध्यापकांनी हे घवघवीत यश संपादन केल्याची माहिती गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी दिली. एलपीटीईएल मार्फत यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये यंत्र विभाग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, संगणक विभाग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभाग, बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज शाखांच्या माध्यमातून १७ विविध प्राध्यापकांनी यश संपादन केले आहे. यंत्र विभागात प्रा.मयूर ठाकूर – नॉन कन्वेंशनल एनर्जी रिसोर्सेस, प्रा. किशोर महाजन- डिझाईन प्रॅक्टिसेस फॉर इंटेलिजंट प्रॉडक्ट डिझाईन, प्रा.पंकज बोंडे- मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन, प्रा. प्रवीण पाटील- टीचिंग अँड लर्निंग इन इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स विभाग, डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा- इंट्रोडक्शन टू इंटरनेट ऑफ थिंग्स, प्रा. जयश्री पाटील- डाटा सायन्स फॉर इंजिनियर्स, प्रा. रेशमा अत्तरदे- डाटा बेस्ड मॅनेजमेंट सिस्टीम संगणक विभाग, प्रा निलेश वाणी- डाटा सायन्स विथ पायथॉन, प्रा.वेलचंद होले- इंट्रोडक्शन टू इंटरनेट ऑफ थिंग्स, प्रा. देवेंद्र फेगडे- प्रोग्रामिंग डाटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स युसिंग पायथॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभाग प्रा.हेमराज धांडे प्रा. महेश एन पाटील, इंट्रोडक्शन टू इंडस्ट्री ४.० अँड इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्सबेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभाग, डॉ.नितीन भोळे- नॅचरल हजार्ड्स डॉ. सरोज भोळे- नॅचरल हजार्ड्स, प्रा. संजय चौधरी- केमिस्ट्री ऑफ मेन ग्रुप इलेमेंट्स, प्रा. तृषाली शिंपी- पार्शियल डिफरेन्शियल इक्वेशन फॉर इंजिनियर्स: सोल्युशन बाय सेपरेशन ऑफ वेरिएबल्स, प्रा. खुशाली बेलदार- बॉडी लँग्वेज: की टू प्रोफेशनल सक्सेस तसेच ऑनलाइन कम्युनिकेशन इन द डिजिटल एजवरील प्राध्यापकांच्या यशामध्ये विविध विभाग प्रमुखांचे वेळोवेळी प्रोत्साहन तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच न्युरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.