जळगाव :- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी घडविण्याच्या परंपरेला अनुसरून जीएनएम (जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी) द्वितीय वर्ष २०२३-२४ अभ्यासक्रमात उत्कृष्ट निकालाची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.
महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन, नियमित मार्गदर्शन, आणि विद्यार्थ्यांच्या कष्टांमुळे हा निकाल शक्य झाला आहे. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध शिक्षण प्रक्रियेचा अवलंब करून उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी साधली.संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,डॉ. अनिकेत पाटील, प्राचार्य विशाखा गणवीर , प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे आणि शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.जीएनएम् द्वितीय वर्षातील काही गुणवंत विद्यार्थी: प्रथम क्रमांक: मनवार अनिशा (८६.५७%)द्वितीय क्रमांक: फुल प्रतीक्षा ( ८५.२८%)तृतीय क्रमांक: बारसे प्रियांशी (८४.७१%)चतुर्थ क्रमांक: टेनपे अनामिका (८४.७१%)पाचवा क्रमांक: कैकाडे दीक्षा (८३.७१%)या यशामुळे गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाले आहे. महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी घेतलेले उपक्रम व प्रयत्न भविष्यातही विद्यार्थ्यांना यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.