जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह चाईल्ड हेल्थ नर्सिंग विभाग प्रमुख तथा सहाय्यक प्रा.अश्विनी मानकर (हरित उपक्रम समितीचे प्रभारी) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात वड, कडूनिंब, आपटे, पिंपळ आदिं वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी एमएस्सीसह जीएनएम तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सहकार्य केले. याप्रसंगी प्रा.पायल वाघमारे, प्रा.शिल्पा वैरागडे यांनी यशस्वीरित्या वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. उपस्थीत मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून सांगितले, याप्रसंगी आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना देखील एक रोप लावून ते जगविण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.