महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस संपन्न
जळगाव – गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आज महिलांवरील हिंसाचार निर्मुलन आंतरराष्ट्रीय दिन संपन्न झाला.
याप्रसंगी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रोफेसर विशाखा वाघ,अॅड नयना झोपे डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य हे उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.त्यांनी उद्घाटनपर भाषणात महीलांनी आपल्यावर अत्याचाराबाबत आवाज उठवला पाहीजे यासाठी विविध कायदे बनवण्यात आले असून फक्त पुढे येण्याचे धाडस करणे गरजेचे आहे. यातून अत्याचार कमी होवू शकतात असे सांगतात कायदयातील विविध बारकावे समजावून सांगितले. यावेळी गोदावरी नर्सिग महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व प्रथमवर्ष व व्दीतीय वर्ष एमएस्सीच्या विदयार्थीनी उपस्थीत होते. स्त्रीरोग विभागाचे प्रमुख प्रा मिनाव देवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यशस्वीतेसाठी सहायक प्रा. जयश्री जाधव,प्रा. स्नेहल जांबुळकर यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन अमृता होके, आभार गोर्कणा गिरी यांनी मानले. यानंतर प्रमुख अतिथींचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.