


जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी हेल्थ सिटी, जळगाव येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.या ध्वजारोहण समारंभास डॉ. प्रशांत सोळंके, अधिष्ठाता, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल; डॉ. एन. एस. अर्वीकर, वैद्यकीय संचालक, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, होमीओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यानंदआठवले,फिजिओथेरेपी महाविद्यालय डॉ. जयवंत नागुलकर,गोदावरी नर्सिंग महाविद्यालय प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग प्राचार्य शिवानंद बिरादर, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले इ यांच्यासह विविध संस्थांचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. एमबीबीएसच्या विद्यार्थिनी . रिया सेलवानी यांनी मनोगत व्यक्त केले.आयुर्वेद विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. . खुशी ठोंबरे (होमिओपॅथी ) व कु. समिक्षा गोपाळे (फिजिओथेरपी ) यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त देशभक्तीपर नृत्याने कार्यक्रमात विशेष रंग भरला. यावेळी डॉ. प्रशांत सोलंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षण, सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. त्यानंतर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करत देशभक्ती ही केवळ भावना न राहता ती आपल्या कर्तव्य आणि कार्यातून दिसून यावी, असे प्रतिपादन केले.लकार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीतपर गीत सादर करण्यात आले. रेडिओलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. किरण पाटील यांनी ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. झाशांक जोशी यांनी केले. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या आयोजक प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून आणि अथक परिश्रमातून स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल सावदा
सावदा— येथील डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुलमध्ये प्रीन्सीपल भारती महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्याचा गौरवपूर्ण इतिहास आणि राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी यांचे स्मरण केले.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एकता, शौर्य, राष्ट्रप्रेम आणि जबाबदारीची भावना जोपासण्याचा संदेश देण्यात आला. तिरंगा हा देशाच्या अभिमानाचे आणि एकात्मतेचे प्रतीक असून, त्याच्या मूल्यांचे सदैव जतन करण्याचा संकल्प करण्यात आला.
उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी
येथे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे,कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी यांच्या हस्ते खिर्डीशिवार येथील कृषि हब येथे सकाळी ७.३० मि ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल भुसावळ
येथील डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुलमध्ये माजी खा. डॉ. उल्हास पाटील प्रीन्सीपल अनघा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्याचा गौरवपूर्ण इतिहास आणि राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी यांचे स्मरण केले.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एकता, शौर्य, राष्ट्रप्रेम आणि जबाबदारीची भावना जोपासण्याचा संदेश देण्यात आला. तिरंगा हा देशाच्या अभिमानाचे आणि एकात्मतेचे प्रतीक असून, त्याच्या मूल्यांचे सदैव जतन करण्याचा संकल्प करण्यात आला









