जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी सी. बी.एस.ई .सायन्स चॅलेंज 2023
मध्ये भाग घेतला होता त्यामध्ये त्यांना उत्तम यश प्राप्त झाले असून त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये सहभागी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
त्यामध्ये इयत्ता आठवीचे यश महाजन , मान्यता कोळी, आणि इयत्ता दहावीतील हर्ष राजपूत व प्रणव पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांना सायन्स बद्दल किती सखोल ज्ञान आहे याची जाणीव होते. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल स्कूलच्या प्राचार्य सौ.नीलिमा चौधरी आणि सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे अभिनंदन केले.