जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मॅकॅनिकल विभागाचे प्रा. हेमंत राजेंद्र नेहेते यांना नुकतीच भोपाळ विदयापिठाने डॉक्टरेट प्रदान केली.
एफईए द्वारे सुधारित ब्लेड डिझाइन आणि सामग्रीद्वारे चाफ कटरचा विकास आणि उत्पादकता वाढवणे या प्रबंधासाठी डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.प्रा.(डॉ.)नीलेश दिवाकर, प्राध्यापक आणि प्राचार्य, आरकेडीएफ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, भोपाळ तसेच गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील तसेच जे. टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मॅकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ डी ए वारके यांचे मागदर्शन लाभले तसेच गोदावरी अभियांत्रिकीचे प्रा. पंकज बोडे यांनी सहाय केले.
गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, संचालिका भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, शैक्षणिक अधिष्टाता प्रा हेमंत इंगळे, प्रशासन अधिकारी डॉ.इश्वर जाधव तसेच मॅकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. तुषार कोळी यांनी आनंद व्यक्त करून अभिनंदन केले.ज्योती विदया मंदीर सांगवीचे निवृत्त प्राध्यापक राजेंद्र पुंडलिक नेहेते यांचे चिरंजिव आहे.