प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनात ४८ प्रकल्प १६१ स्पर्धकांचा सहभाग
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आज आईईईई टेक्नोवेशन २०२४ या टेक्निकल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले.यात व्हीएलएसआय, रोबोटिक्स, सायन्सेस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या थीम सादर करण्यात आल्यात. ४८ प्रकल्प १६१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील मॅडम, प्रा. दत्तात्रेय सावंत (चेअरमन स्टुडन्ट ऍक्टिव्हिटीज कमिटी, आईईईई, बॉम्बे सेक्शन, मुंबई) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे तसेच अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे(स्टुडन्ट ब्रांच कौन्सिलर), कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (विभाग प्रमुख, -आयडीएस) तसेच प्रा. ज्योती कुंडले (रामराव अदीक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, नवी मुंबई), प्रा. स्वप्नाली माकडे(फादर रॉड्रिग्ज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, मुंबई), प्रा. महेश एन पाटील, प्रा. निलेश चौधरी हे परिक्षक उपस्थित होते.हा कार्यक्रम स्टुडन्ट ब्रांच गोदावरी अभियांत्रिक महाविद्यालय मार्फत घेण्यात आला. सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आली. प्रस्ताविकात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी टेक्नोवेशन संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देत स्पर्धेमधून विद्यार्थ्यांना त्यांचे टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. प्रा. दत्तात्रय सावंत यांनी टेक्नोवेशन बद्दल बोलताना राबवीत असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्पर्धेच्या नियमाबद्दल सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये कनेक्टिव्हिटी, सिम्पलीसिटी, कोर व्हॅल्यूज, हुम्यानिटी या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये यशस्वी होतील. गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेबद्दल शुभेच्छा दिल्या व अशाप्रकारचे कार्यक्रम नियमित राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली. ही स्पर्धा जळगाव, छत्रपती संभाजी नगर, परभणी, बुलढाणा, लातूर, जालना, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. समारोप मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाने झाला. प्रथम ५००० रु द्वितीय ३००० रु, तृतीय २००० रु कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलाक्षी बर्डे, प्रेरणा पाटील, कोनिका पाटील, हेमाक्षी राणे, हेमांगी बावा व ऋषिकेश पाटील समन्वयक *डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा यांनी केले. प्रा. हेमंत इंगळे व डॉ. विजयकुमार पाटील यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.
टेक्नोवेशन २०२४ चे विजेते सॉफ्टवेअर प्रकार
प्रथम संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग शेगावचे रजत किरण पाटील,जान्हवी पाटील,डिजिटल नोटीस बोर्ड युजिंग रास्पबेरी पाय, द्वितीय गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगावचे हर्षल महाजन,पवन बडगुजर ,खुशबू पाटील,शुभम संदानशिव यांच्या आउट डूइंग बॅरियर्स इन ई – लर्निंग प्रकल्प तर तृतीय गोदावरी तंत्रनिकेतन जळगावचे सुयोग राणे,मृगेश पाटील ,वंश येवले,वरूण पाटील यांच्या प्रेझेन्स प्रो या प्रकल्पास देण्यात आले. हार्डवेअर प्रकारात प्रथम आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूरचे अमोल पांडे दर्शन घुगे यांचा एपीआर रेशन की प्रकल्प,द्वितीय गोदावरी अभियांत्रिक महाविद्यालय जळगावचे महेश नारखेडे,जीवेश अत्तरदे,खगेश नारखेडे ,उत्कर्ष तंबोलीयांच्या डायनामिक वायरलेस ईव्ही चार्जिंग प्रकल्प,तृतीय विजेता एस एस व्ही पी एस देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळेचे मोहित बडगुजर,रिया भोई यांच्या व्हिजन बूस्ट प्रकल्पास देण्यात आला.