जळगाव ;– जागतिक रक्तदाता दिनानिमीत्त आयोजित रक्तदान शिबीरात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यपकांनी रक्तदान केले. शिबीरात ३५ पिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग तर्फे आयोजित या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबीराच्या सुरूवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य विशाखा गणविर यांनी जागतिक रक्तदाता दिनाचे महत्व विशद केले. त्यानंतर रक्तदान शिबीराला सुरूवात करण्यात आली. या शिबीरात प्राध्यापक, विद्यार्थी असे ३५ दात्यांनी रक्तदान केले.यांची होती उपस्थिती – शिबीरप्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे,मेडीकल सर्जिकल नर्सिंगच्या प्रमूख रक्तदाता दिनानिमीत्त ३५ दात्यांचे रक्तदानप्रा.मनोरमा कश्यप, प्रा.पियुष गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रमवाघ, प्रा. रश्मी टेंभुर्णे,युथ रेडक्रॉस विंग प्रमुख प्रा प्रशिक चव्हाण आणि प्रा. शिल्पा वैरागडे,यांच्यासह सहकारी उपस्थित होते. तसेच रक्तदान शिबीरासाठी डॉ. उल्हास पाटील रक्तपेढीचे समन्वयक राज तनवर तसेच शेख,आणि लक्ष्मण पाटील यांनी परिश्रम घेतले.