जळगाव – येथील गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोविडच्या पार्श्वभुमीवर नियमांचे पालन करून शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचे हस्तेे ध्वजारोहण करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य रवींद्र पुराणिक प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर प्रशासन अधिकारी राहूल गिरी,होमीओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. डी.बी.पाटील, डॉ.चंद्रय्या कांते, डॉ. माया आर्विकर, सुरेंद्र गावंडे,ग्रंथपाल भोळे इ मान्यवर उपस्थीत होते. कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एस.एम.पाटील, डॉ सपकाळे यांच्यासह पालक, विद्यार्थी व महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य अॅड सतिष गाडगे, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ व्ही एच पाटील, उपप्राचार्य प्रविण फालक, गोदावरी आयएमआर महाविद्यालयात डॉ प्रशांत वारके, डॉ. वर्षा पाटील फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात प्राचार्य उज्वला मावळे, गोदावरी संगीत महाविद्यालयात प्राचार्य पदमजा नेवे, गोदावरी टी आय प्रकल्प येथे राजू पाटील इ मान्यवर उपस्थीत होते.








