२६ रुग्णांची हृदयाची सोनोग्राफी
जळगाव (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त गोदावरी फाऊंडेशन वश्री संत सावता माळी मित्र मंडळ व वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आसोदा येथील माळीवाडा येथे रविवार दि.९ एप्रिल रोजी मोफत टू डी इको व महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
शिबिरात मेडिसीन निवासी डॉ.विशाल, डॉ.अब्दुल्ला, सर्जरीचे डॉ.श्वेता, ऑप्थल डॉ.नेहा, ओबीजीवाय डॉ.नेहा, इएनटी डॉ.रितू रावल, ऑर्थोचे डॉ.पियूष, पेडियाट्रिकचे डॉ.शिवानी यांनी रुग्णांची तपासणी केली. टू डी इकोसाठी जैस जोश यांचे सहकार्य लाभले. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ग्रामस्थांनी येवून आरोग्य तपासणी करुन घेतली. पाच तासाच्या ओपीडीत १८२ रुग्णांना तपासणीचा लाभ घेतला आला असून डॉक्टरांनी ३८ रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी रेफर केले. यात कार्डियाक ९, ऑप्थल १०, मेडिसीन ४, सर्जरी ५, ऑर्थो ५, इएनटी ८ इतक्या रुग्णांचा समावेश आहे. सदर रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. गुरुवार दि.१३ एप्रिल रोजी रुग्णांसाठी वाहनव्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिबिरासाठी रुग्णालयातील मार्केटिंग टिम पीआरओंसहीत स्थानिक जितेंद्र गवळी, डॉ.मोईज देशपांडे, प्रदिप माळी, दिपक माळी, डिगंबर माळी, रुपेश माळी, चंद्रभान माळी, प्रदिप माळी आदिंचे अनमोल सहकार्य लाभले.
हृदयविकारी रुग्णांना दिलासा
शिबिरात हृदयविकारी रुग्णांना मोफत टू डी इको तपासणीमुळे दिलासा मिळाला आहे. हृदयविकाराचा झटका येवून गेलेल्या तसेच हृदयविकाराची लक्षणे दिसत असलेल्या २६ रुग्णांची यावेळी हृदयाची सोनोग्राफीही शिबिरात करण्यात आल्यात. त्यातील ९ रुग्णांची एन्जीओग्राफी रुग्णालयात केली जाणार आहे. रुग्णांनी सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे.