पोलीस उपनिरीक्षक गणगे यांचे मार्गदर्शन
पाचोरा (प्रतिनिधी) : गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि. २२ जुलै रोजी वाहतूक सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणगे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका पी.एम. वाघ यांच्या हस्ते गणगे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गणगे यांनी इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नवीन कायदे, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी व विद्यार्थ्यांनी, पालकांनी मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम संपल्यानंतर गणगे यांनी इ. १० वी च्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.
याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे, पर्यवेक्षक आर.एल.पाटील, ए.बी.अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी. तडवी यांची उपस्थिती होती. उज्वल पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.