गोदावरी अभियांत्रिकीचा शैक्षणिक उपक्रम
जळगाव – येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच आंतरराष्ट्रीय ऑनलाईन सर्टीफिकेशन कोर्स वेबीनार पार पडला. यात गुगल मीटच्या माध्यमातून १०० च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी विद्यापीठाकडून निर्धारित अभ्यासक्रमा व्यतीरिक्त व्यवसायाभिमूख शिक्षण कौशल्य वृध्दींगत करणारे शिक्षण मिळण्यासाठी ऑनलाईन सर्टीफिकेशन कोर्स समीतीची घोषणा केली असून चेअरमनपदी प्रा. निलेश वाणी यांची निवड करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून आतंरराष्ट्रीय सर्टीफिकेशन कोर्स वेबीनारचे उद्घाटन प्राचार्य डॉ विजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. प्रा निलेश वाणी यांनी ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज असून माहितीचा खजिना आहे. ऑनलाईन शिक्षण देणार्या अनेक संस्था असून त्याबाबत थोडक्यात माहिती देणार आहे असे सांगत प्रा वाणी यांनी स्वयंम — स्टडी वेडस ऑफ अॅक्टीव लर्निंग फॉर यंग अस्परिंग माइंड, एनपीटीईएल नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नीकल एनहान्सड लर्निंग, ईडीएस, हावर्ड व एन आय टी या विश्वविख्यात अमेरिकन संस्था तर्फे चालवले जाणारे कोर्सेस कोर्सएरा, विश्वविख्यात स्टॅनफोर्ड विद्यापिठातर्फे चालवणे जाणारे कोर्स या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था व्यक्तीरिक्त उडेमी व्यवसायीक शिक्षण देणारा आंतरराष्ट्रीय उपक्रम हबस्पॉट,अॅकाडेमी, फ्युचर लर्न, स्कीलशेअर, लिंकडीन लर्निंग, इ मोफत व अल्प शुल्कात शिक्षण देणार्या संस्थाची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी संस्थेचे विभागप्रमुख प्रा. प्रमोदगिरी गोसावी, प्रा. हेमंत इंगळे, प्रा. तुषार कोळी, प्रा. अतुल बर्हाटे, डॉ. नितीन भोळे, ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट ऑफीसर विजयकुमार वानखेडे आणि सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थीत होते.