जळगाव (प्रतिनिधी) – हातपाय धुण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्यांचा पाय घसरून खड्ड्यात पडल्याने बुडाल्याची घटना आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आव्हाणे गावाजवळील गिरणानदी पात्रात घडली. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
पंकज किरण भोई (वय-२४) रा. आव्हाणे ता. जळगाव हा तरूण शेती काम करतो. त्यांचे गिरणा नदीच्या किनाऱ्यावर शेत आहे. आई वडीलांना शेतात पंकज हा लहान भाऊ राधेश्यामसह मदत करतात. आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेतातील काम आटोपून पंकज आणि लहान भाऊ राधेश्याम हे पायी घराकडे निघाले. दोन्ही भाऊ गिरणा नदी पात्रात हातपाय धुण्यासाठी उतरले. यात पंकज हा हातपाय धुत असतांना नदीतील वाळूच्या खड्ड्चा अंदाज न आल्याने पाण्यात पडला. वाळूच्या खड्ड्यांमुळे पंकज बुडाला. हे पाहून लहान भाऊ राधेश्याम यांने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. परिसरातील नागरिकांनी धाव घेतली असून मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.