जामनेर ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडी सरकारला सामान्य नागरिक व शेतकर्यांचे काही देणेघेणे नसून केवळ वसुली हाच अजेंडा आहे. मंत्र्यांमध्ये पोलिस-चोर असा खेळ सुरू असल्याची टीका आमदार गिरीश महाजन यांनी आज केली.
राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी झालेले आहे. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून वसुली हाच महाविकास आघाडी सरकारचा अजेंडा आहे असेही ते म्हणाले . ते भाजपच्या तालुका बैठकीत बोलत होते.
आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची तालुका बैठक शुक्रवारी झाली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा पाटील, सरचिटणीस सचिन पानपाटील, नवलसिंग पाटील, चंद्रकांत बाविस्कर, गोविंद अग्रवाल, शिवाजी सोनार, छगन झाल्टे, दिलीप खोडपे, तुकाराम निकम, बाबुराव घोंगळे, राजधर पांढरे, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, डॉ. प्रशांत भोंडे, संजय देशमुख, जलाल तडवी, संजू पाटील, नाना सोनार, अतिष झाल्टे, नीलेश चव्हाण, बाळू चव्हाण, रमेश नाईक आदी उपस्थित होते.
आमदार राजूमामा भोळे यांनी भाजपची ध्येयधोरणे आणि केंद्र सरकारची कामगिरीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक चंद्रकांत बाविस्कर यांनी केले रवींद्र झाल्टे यांनी आभार मानले. आगामी निवडणुकांबाबत नेत्यांनी मार्गदर्शन केले.