जामनेर (प्रतिनिधी ):- सध्या वातावरणातील बदलामुळे सगळीकडे सर्दी खोकला ताप व साथ रोगाचे रूग्ण दिसत आहेत. याकरीता गिरीष महाजन फाऊंडेशन व न्यू रुबीस्टार हॉस्पिटल, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ ते १७ जानेवारी दरम्यान सामान्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात नागरिकांची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती न्यू रुबीस्टार हॉस्पिटलचे सीईओ डॉ.धनराज चौधरी यांनी दिली.
या मोफत तपासणी शिबिरात जनरल तपासणी, रक्त, लघवी तपासणी, ईसीजी काढणे, सलाईल लावणे, इजेंक्शन देणे, ग्लुकोमिटरवर साखर तपासणी, वाफ देणे, ड्रेसिंग करणे यासह अन्य प्रकारचे औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत. याशिवाय गरज भासल्यास हृदयरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, डोळे तपासणी, दात व मुख तपासणी देखील तज्ञ डॉक्टराच्या मार्फत करण्यात येणार आहेत. हे शिबिर १५ ते १७ जानेवारी दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत न्यू रुबीस्टार हॉस्पिटल, पहिला मजला, बीओटी कॉम्प्लेक्स, पाचोरा रोड, जामनेर येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी 8788390646 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच शहरासह परिसरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.धनराज चौधरी यांनी केले आहे.