भडगाव तालुक्यातील गिरड येथे कारवाई
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील गिरड परिसरात एक अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर दि. २९ जुलै रोजी रात्री १० वाजता पकडण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे. हे डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
भडगाव तालुक्यातील गिरड परिसरातून वाळू वाहतूक करणारे एक डंपर हे पळून जात असताना त्याचा महसूल विभागाने पाठलाग केला. हे डंपर मौजे अंतुर्ली ता. पाचोरा येथे पकडण्यात आले. डंपर पाचोरा तहसील कार्यालय येथे पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात आले आहे. (केसीएन) सदर कारवाई पाचोरा प्रांत अधिकारी भूषण अहिरे, भडगाव तहसीलदार विजय बनसोडे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.
सदर महसूल पथकात पाचोरा व भडगाव येथील आर डी पाटील तलाठी, राहूल पवार तलाठी गिरड, अविनाश जंजाळे तलाठी भडगाव, आशिष काकडे तलाठी जारगाव, सुनील राजपूत , तात्याराव् सपकाळ तलाठी नगरदेवळा यांचा समावेश होता. पुढील कार्यवाहीसाठी या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू असून दंडात्मक कारवाई करण्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.