वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – गरताड येथे विज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आज दि २७ जून रविवार रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वडतीसह परिसरात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटसह पावसाने हजेरी लावली. चोपडा तालुक्यातील गरताड या गावी दारासिंग दलसिंग बारेला हा दुसऱ्या शेतकऱ्यांची शेती उकत्याने करून आपले उदरनिर्वाह करीत होता .
दारासिंग दलसिंग बारेला आपल्या शेतात काम करीत असताना अचानक पावसाने हजेरी लावली त्यामुळे त्याने आपली बैलजोडीस झाडाखाली बांधून तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन आडोश्याला उभा राहिला. त्यावेळी अचानक विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन बैलांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोघेही बैलांच्या जागीच मृत्यू झाला आहे . सदर बैलजोडीची किंमत एक लाख रुपयांचे वर सांगण्यात येत आहे . शेतकरी आधीच विविध प्रकारच्या संकटात होरपळून निघत असून त्यात पुन्हा अचानक आलेल्या संकटांना त्याला तोंड द्यावे लागत आहे .घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
तसेच ब-याच दिवसाच्या प्रतिक्षे नंतर वडती , वर्डीसह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेत जमीनीतून पाणी भरभरून वाहवू लागले . आज चितेंत असणारा शेतकरी मात्र आंनदाने सुखावला गेला .
याघटने याबाबत महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामा करण्यात आलेला आहे .