जळगाव ( प्रतिनिधी ) – मंगळवारी तांबापुरा परिसरातील फुकटपुरा भागात घरफोडी झाली होती. सरफराज खान पठाण यांच्या घरातील 68 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला होता . या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला. त्याचा एक साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
तांबापुरा परिसरातील फुकटपुरा येथे सरफराज खान अयुब खान कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते व त्यांचा मुलगा खाजगी वाहन चालक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री सरफराज खान यांचा मुलगा बाहेरगावी गेलेला होता. रात्री खान कुटुंबीय खालील घराला कुलूप लावून वरील माळ्यावर झोपण्यास गेले. मध्यरात्री चोरट्यांनी खान यांच्या वरील खोलीला आणि शेजारी राहणार्या इतर घराला बाहेरून कड्या लावल्या. खान यांच्या घराचा कडी कोंडा तोडत घरातील कपाटामधून १५ ग्रॅम सोन्याची पोत, चांदीचे कडे, चांदीची पोत, चांदीची अंगठी, १२ हजार रोख असा दीड लाखांचा ऐवज लांबविला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंगळवारी सकाळी सरफराज खान हे उठले दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजार्यांची संपर्क साधला. शेजार्यांचा देखील दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी परिसरातील इतर काही नागरिकांना संपर्क करून बोलावले. खान कुटुंबीय खाली आल्यानंतर त्यांच्या खालच्या घरात कडी कोयंडा तुटलेले तर घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसले. चोरीची खात्री झाल्यावर सरफराज खान यांनी एमआयडीसी पोलीसांना माहिती दिली.
संशयित आरोपी मेहरुण तलावाच्या जंगल परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर सदर अल्पवयीन यास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे ,मुदस्सर काजी ,गोविंदा पाटील, सचिन पाटील अशाने त्यास ताब्यात घेतले.
घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून 61 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. पोलिसांच्या ताब्यातील अल्पवयीन मुलाचा साथीदार सोनु सलीम शेख (रा. फुकटपुरा) पसार झाला आहे. अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर यापुर्वी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक व जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे