जामनेर तालुक्यातील पहुर येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूरपेठअंतर्गत असलेल्या संतोषीमाता नगरात एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोडी करून १ लाख सहा हजारांची रोकड व २५ हजारांचा ऐवज लांबविला. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे. पहूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पहूरपेठ येथील रहिवासी नरेंद्र मगनराव मोरे घरी नसताना चोरट्यांनी घरफोडी केली. त्यांच्या घरातून ७० हजारांची रोकड, सोने व चांदीचे दागिने लांबविले. ही घटना मंगळवार उघडकीस आली. याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुर्गाबाई सुकलाल कुमावत यांच्या घरीदेखील चोरट्यांनी संधी साधली. बंद घर फोडून ३६ हजारांची रोकड यासह दागिने असा एकूण १ लाख २६ हजारांसह मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याबाबत नरेंद्र मोरे यांनी फिर्याद दिल्याने पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.