• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भोईटेनगरात धाडसी घरफोडी, ३ लाख २० हजारांचा ऐवज लांबवला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगावात एका घरफोडीचा प्रयत्न

जळगाव (प्रतिनिधी) : चोरट्यांनी शहरातील भोईटेनगर येथे गौरी प्राईड अपार्टमेंटमधील एका शिक्षकाचे घर फोडून ३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर बाळासाहेब देशमुख ( वय ३६, रा.गौरी प्राईड अपार्टमेंट, भोईटेनगर) हे शिक्षक असून, ते पत्नी व दोन मुलांसोबत भोईटेनगरात वास्तव्यास आहेत. शनिवारी परिवारासह अडावद येथे उत्तरकार्यासाठी गेले होते. ते सोमवारी परत येणार होते. दरम्यान, चोरट्यांनी बंद घर असल्याचा फायदा घेत, रविवारी रात्री घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून १ लाख ४० हजार रुपये किंमतेचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, ७० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगळ्या, ७० हजार रुपये रोख रक्कम, १४ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा, तर काही चांदीचे दागिणे मिळून ३ लाख २० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

सोमवारी सकाळी मयूर देशमुख यांच्या शेजाऱ्यांना देशमुख यांच्या घराच्या दरवाज्यावरील कडी-कोयंडा पडलेला दिसला. लागलीच शेजारच्यांनी मयूर देशमुख यांना फोन करुन, त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली. काही वेळानंतर देशमुख परिवार घरी पोहचल्यानंतर, त्यांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. या प्रकरणी मयूर देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामचंद्र शिखरे हे करत आहेत.

शहरातील दूध फेडरेशन परिसरात महावीर नगर भागातही संगिता महेश ओझा यांचे घर फोडण्याचा प्रयत्न रविवारी झाला. संगिता ओझा या घरी नसताना, रविवारी पहाटे चार अज्ञात चोरटे घरात शिरले. सुदैवाने चोरट्यांना घरात काहीच आढळून न आल्याने ते परतले. संगिता ओझा सोमवारी घरी परतल्यानंतर, त्यांच्या घरातील सामान अत्यावस्थ पडलेले दिसून आले. त्यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 13,600 रुपये मदत

Next Post

तालुकास्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिस वितरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तालुकास्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिस वितरण

तालुकास्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिस वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon