शिरसोली प्र.न. बसस्टँड जवळील घटना

शिरसोली (प्रतिनिधी) – येथे बसस्टॉपवरील भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझावरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुना पान सेंटर शेजारी असलेल्या झाडावर आदळली यात चालक जखमी झाला तर यावेळी मोठा अनर्थ टळला. आज रात्री 10 वाजेची घटना

शिरसोली बसस्टॉप नेहेमी गजबजलेला इरिया दिसून येतो पण आज पाऊस सुरु असल्याने रात्री 10 वाजेच्या सुमारास सामसूम झालेली होती. जळगाव येथिल डेप्युटी इंजिनिअर सचिन पाटील रा.मानराज पार्क हे चाळीसगाव कडून ब्रेझा क्रमांक. एम.एच 19 सी.यु. 7400 वर भरधाव वेगाने जळगाव येत असतांना. पाटील यांचा ब्रेझा गाडीवरील ताबा सुटल्याने शिरसोली बसस्टॉपवरील पुना पान सेंटर शेजारी असलेल्या झाडावर आदळली गेली. पाऊस सुरु असल्याने बसस्टॉपवर कोणीच नसल्याने मोठा अनर्थ ठळला. यात पाटील हे जखमी झाले असुन त्याना जळगाव उपाचारासाठी खाजगी दवाखान्यात नेण्यात आले आहे. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत पोलीसात कुठलीही नोद नाही









