महेश कोठवदे बिनविरोध अध्यक्षपदी

अमळनेर ( प्रतिनिधी ) शहरातील समस्त वाणी समाज पंच मंडळ कार्यकारिणीची मिटींग घेण्यात आली यावेळी मिटींग मध्ये सर्व संचालकांनी एकमताने अध्यक्षपदी बिनविरोध महेश पांडूरंग कोठावदे ,उपाध्यक्ष्या सौ.अरुणा अनिल अलई ,सेक्रेटरी दत्तात्रय वामन भामरे,खजिनदार प्रकाश काशिनाथ अमृतकर,सहसेक्रेटरी स्वाती राजेश कोठावदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी संचालक पंकज मराठे,जितेंद्र राणे,योगेश येवले,विनोद कोठावदे ,सुनिल भामरे,सुनिल मोरणकर हे उपस्थित होते. अध्यक्षांनी समाजहिताचे कार्य करण्यास बांधील असल्याची प्रतिक्रिया दिली.तर समस्त वाणी समाज पंच मंडळ व अमळनेर वाणी समाज कार्यकारिणीचे बांधव अभिनंदन करीत आहेत.







