जळगाव ;- सन्वरीच्या पैशांवरून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात टॉमी टाकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत माहिती अशी की, शेख अनवर शेख इर्शाद (वय-२७) रा. फातेमा नगर, जळगाव हा ट्रकवर क्लिनरचे काम करतो. दोन महिन्यांपुर्वी शेख शाहीद शेख फारुख (वय-२४) रा. सुप्रिम कॉलनी यांच्याकडून अनवरने ३ हजार रूपये उसनवारीने घेतले होते. आज सकाळी अनवरच्या घरी शाहीद गेला आणि पैश्यांसाठी तगादा लावला. दुपारपर्यंत पैसे देतो असे सांगितले. दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास पैश्यांच्या वाद झाला. यात अनवरने शाहीदच्या कानशिलात लगावली. याचा राग आल्याने शेख शाहिद यांने ट्रकमधील ट्रॅमी डोक्यात हाणली. यात अनवरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारार्थ जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.