चाळीसगाव ;- तालुक्यातील तांबोळे बुद्रक येथील सुपुत्र सागर रामा धनगर (२७) हे मणिपूरमधील सेनापती येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झाले. ही घटना ३१ रोजी पहाटे दोन वाजता घडली. सागर धनगर हे नोव्हेंबर २०१७ मध्ये ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. सागर यांचे पार्थिव १ रोजी दुपारी २ वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात येणार आहे. तेथून ते मुंबई येथील विमानतळावर सांयकाळी ७.१५ वा. पोहचेल. त्यांनतर ते मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुळगावी आणण्यात येईल. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.








