मुंबई ;- विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर कॉंग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे दीड वाजता अर्ज भरणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब, मंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे देखील उपस्थित होते.








