जळगाव – कोरोनानंतर म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचे संकट उभे राहिले आहे. कोविड काळात डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने जे मोलाचे योगदान दिले त्याच धर्तीवर आता म्युकरमायकोसिस या गंभीर स्वरुपाच्या आजाराशीही दोन हात करण्यासाठी डॉ.पाटील रुग्णालय सज्ज झाले आहे, जळगाव जिल्ह्यात एमकेव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत निदान ते परिपूर्ण उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आधीच कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांवर आता म्युकरमायकोसिस या गंभीर स्वरुपाच्या आजाराचे नवे संकट आले आहे, कोरोनातून बरे झाल्यानंतर या आजाराच्या रुग्णांमध्येही आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील या आजाराच्या रुग्णांची संख्या आता वाढत आहे. म्युकरमायकोसिसच्या आजाराचे नवे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे असले तरी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत निदान ते परिपूर्ण उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. या आजारावरील उपचारांसाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णायात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे तसेच नाक, कान, घसा विभागातील निष्णात आणि तज्ञ डॉक्टरांची टिमही रुग्णांवर उपचारासाठी सज्ज आहेत. चार टप्पयामध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहे. आतापर्यंत डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात १८ ते २० रुग्णांवर मोफत यशस्वी उपचार करण्यात आले आहे.
एकमेव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली संपूर्ण उपचार
म्युकरमायकोसिस आजाराच्या निदानासाठी आवश्यक संपूर्ण तपासण्या या डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एकाच छताखाली उपलब्ध आहेत. तपासण्यांपासून ते रुग्णांवर होणार्या संपूर्ण उपचारासाठी २४ तास डॉक्टरांची टिम कार्यरत आहे. कोविडप्रमाणे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी लागणारी सर्व प्रकारची औषधी देखील डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील औषधालयात उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळ आणि फिराफिर देखील वाचणार आहे.
खान्देश, विदर्भासह परराज्यातील रुग्णांवर होणार मोफत उपचार
खान्देश, विदर्भ आणि परराज्यातील रुग्णांवरही एकमेव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात मोफत उपचार केले जात आहे. यासाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत रुग्णाकडे मतदान कार्ड, आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच परराज्यातील रुग्णांकडे आयुषमान भारत योजनेचे कार्ड असल्यास त्यांच्यावर देखील मोफत उपचार केले जातील. तरी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाला उपचारासाठी भरती करतेवेळी योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे रुग्णालयातील संबंधित विभागाकडे जमा करावेत असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हिस्टोपॅथॉलॉजीस्टची भूमिका महत्वाची
म्युकोरमायकोसिस या आजाराचे निदान होण्यासाठी रक्ताच्या चाचण्या, सीटी स्कॅन किंवा एमआरआय तसेच तुकड्याची तपासणी अर्थात हिस्टोपॅथॉलॉजीस्टची भूमिका ही महत्वाची ठरत आहे. हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट येण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो, मात्र खरोखर म्युकरमायकोसिस हा आजार आहे का याचे निदान खात्रीशीर होते.