जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठली ७४४ ची संख्या
जळगाव ;- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून काल एकूण ५५ आणि नंतर २३ रुग्ण आढळले होते . आज पुन्हा रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या ७४४ झाली असून आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात धरणगाव ३ , भुसावळ १२ ,जळगाव १२ ,जळगाव ग्रामीण आव्हाने 1 , अमळनेर ५ ,पाचोरा २, यावल ४ ,चोपडा १, जामनेर २ ,सावदा २, रावेर १ अशा पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश असल्याची माहिती दुपारी सूत्रांनी दिली . संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल ४५ पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ७४४ इतकी झाली आहे.
जिल्हा कोविड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात एकुण ४५ रूग्ण पॉझिटीव्ह आले आहे. यातील आठ हे आधीदेखील पॉझिटीव्ह असून त्यांचा रिपोर्ट दुसर्यांदा पॉझिटीव्ह आलेला आहे.एकुण बाधितांचा आकडा आता ७३८ वर पोहचला आहे.